‘जॉनी जॉनी’ ही कविता बहुतेक सगळ्यांनी लहानपणी ऐकलेली आहे. ही कविता बरेचदा नेमक्या अशा वयात शिकवली जाते की, जॉनी आणि पप्पा सोडून कशाचाच अर्थ माहीत नसतो. या शब्दांना स्पेलिंग असते, हेही नंतर कळते. आपल्या मराठी मुलांना मराठी कविताच आपली वाटेल या विचाराने आपोआप माझ्याकडून त्या कवितेचे भाषांतर झाले. ते असे ः
:” राजू, राजू …”
:”काय बाबा ?”
:”साखर खाल्लीस ?”
:”नाही, बाबा.”
:”खोटं बोलतोस ?”
:”नाही बाबा…”
:”आ कर बरं…”
:”हा ! हा ! हा !..”